जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

संत शिरोमणी व क्रांतिकारी सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची तसेच पोस्टरची पुणे येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून विटंबना करण्यात आली आहे. त्या संदर्भात जामनेर तालुक्यातील सर्व पक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटना व सेवाभावी संघटना यांनी एकत्र येऊन जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.
तसेच या संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचं निलंबन करण्यात यावं असेही निवेदनात म्हटले आहे. सद्गुरु श्री. सेवालाल महाराज यांच्या विचारांचा पाईक असलेला बंजारा समाज या घटनेने अतिशय सुन्न झालेला असून त्या निंदनीय घटनेचा निषेध करण्याकरिता यावेळी गुरुदेव सेवा आश्रम चे संत श्री. श्याम चैतन्यजी महाराज, रमेश नाईक, निलेश चव्हाण,मूलचंद नाईक, सोनू सिंग राठोड, रामकिशन नाईक, बाळू चव्हाण, भानुदास चव्हाण, संजय राठोड, इंदल जाधव, गोपीचंद राठोड, दीपक चव्हाण, नटवर चव्हाण, उदल नाईक, डॉ. विश्वनाथ चव्हाण, मेघराज नाईक, अक्षय जाधव, दिपक पवार, ब्रिजेश राठोड, सौ. अंजू ताई पवार, श्रीमती निर्मला चव्हाण, सौ.शकुंतला जाधव, विशाल नाईक, विकास पवार, दिनेश पवार, अक्षय राठोड, युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

