Sunday, January 29, 2023

बँकेत कोट्यवधींचे दागिने लंपास; कर्मचार्‍यांनीच केला हात साफ..

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेले दागिने लंपास केल्याची घटना समोर आली असून या चोरीत  बँकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी काही तासांमध्ये  उघडकीस आणला  आहे.

तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व पोलिसांनी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे. या जबरी चोरीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

घटना स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डा. प्रविण मुंडे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासा बाबत सुचना केल्या आहेत. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा असुन येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहे. दि. २२ नोहेबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली.

चोरी झाल्याची माहिती कर्मचाऱ्यानेच  गावातील नागरीकांना दिली. यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलीसाना देण्यात आली. पोलीस घटना पोहताच बँकेत  प्रत्यक्ष घटनास्थळी चोरी करताना चोरांकडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता. तसेच बँकेत असलेल्या रोकड रक्कमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा असा संशय प्रथमदर्शनी येत होता.

दरम्यान, याच बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलीसी खाक्या पोलीसानी दाखविला असता तो पोपटासारखा बोलुला लागला. या जबरी चोरी प्रकरणी बक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आरोपी वाढ होण्याची शक्यता पोलीसाकडुन वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथिल श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.

भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी कर्मचारी व अन्य दोन साथीदार यांच्याकडून  याबाबत खात्री करत तिघे आरोपी पैकी एका आरोपीच्या आमडदे शेत शिवारातील जोगडा कडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे आरोपीनी काढुन दिले.

घटनास्थळी पोलीस टीम पोलीस पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, डीवायएसपी सचिन गोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गावडे, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक, त्याचे पथक पोलीस लक्ष्मण पाटील, भडगाव सहा. फौजदार कैलास गिते, पोलीस का. विलास पाटील, स्वप्निल चव्हाण, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, चालक राजु पाटील करीत आहेत.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे