Sunday, May 29, 2022

फ्रॅन्चाईसीच्या नावाखाली ५ लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतांना दिसत आहेत.  कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या नावाखाली पोराळा येथील एकाची  ५ लाख रूपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.  याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पारोळा शहरातील तलाव गल्लीत राहणारे संजय मोहनलाला शर्मा हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. जुलै २०२० ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान त्यांना एका नंबरवरून फोन आला. साईराम बालाजी पाटील आणि परमेश बालाजी पाटील असे नाव सांगून डेनिम हब लाईफ स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली.

आपल्याला या कंपनीची फ्रॅन्चायसी देतो असे सांगून दोघांनी वेगवेगळ्या कारणासाठी संजय शर्मा यांच्याकडून ५ लाख रूपये ऑनलाईन मागावून घेतले. पैसे देवून फ्रॅन्चायसी मिळाली नसल्याने शर्मा यांनी पैशांची मागणी केली. दोन्ही व्यक्तींकडून कुठल्याही रकमेचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय शर्मा यांनी जळगाव येथील सायबर पोलीसात धाव घेतली.

संजय शर्मा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या