फैजपूर प्रतिनिधी: संपुर्ण देशभरात कोवीड लसीकरण मोहीम राबवून कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात असतांनाच फैजपूर शहरात मात्र अजुनपर्यंत शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक,आजारी नागरिक तसेच दिव्यांग बांधव यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून शहरापासून चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावी,हिंगोणा इत्यादी लसीकरण केंद्रांवर जावे लागत आहे.
यासंदर्भात सर्वप्रथम खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी आवाज उठवला असुन २३ एप्रिल रोजी त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी, प्रांताधिकारी व आमदार शिरीष चौधरी यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ दखल घ्यावी व फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली होती.यानंतर देखील शहरातील अनेकांनी विविध मार्गाने ही मागणी लाऊन धरली आहे.
मंगळवार २७ एप्रिल रोजी नारीशक्ती गृप अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांना इमेल द्वारे निवेदन पाठवले असून लवकरात लवकर दखल घेऊन फैजपूर येथे शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.