फैजपूर :- रमजान ईद निमित्त खान्देश नारीशक्ती गृपतर्फे फैजपूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांना रमजानच्या पवित्र नमाज पठणानंतर ईदगाह मैदानावर थंडगार पाणी वाटप करण्यात आले. सकाळी ७ वाजेपासुन ईदगाह मैदानावर ११ वाजेपर्यंत भर उन्हात नमाज साठी थांबलेल्या लहान मोठ्या सर्व बांधवांना खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व राष्ट्रीय नमो सेना महिला जिल्हाध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी थंड पाणी वाटप करून शेकडो लहान-थोर मुस्लिम समाज बांधवांची पवित्र ईदच्या दिवशी तहान भागवून एकप्रकारे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवले व समाजसेवेच्या आड कधीच कोणती जात धर्म पंथ किंवा प्रांत येत नसुन माणुसकी हाच एकमेव धर्म असतो हे दाखवून दिले.
यावेळी मा.आमदार शिरीष दादा चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,मा.उपनगराध्यक्ष कलीम खान मण्यार,सपोनि.दत्तात्रय निकम साहेब,भाजपा शहराध्यक्ष संजय रल,प्राचार्य जी.पी.पाटील सर, नगरसेवक रियाज मेंबर, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदिपभाऊ पाटील,मुख्याध्यापक गणेश गुरव सर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले, पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख,मंडळ अधिकारी बंगाळे आप्पा, दिव्यांग सेनेचे एहसान कुरेशी,सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव,संजय राजपूत,डी.एल.तायडे इ.मान्यवरांनी पाणी वाटप स्टॉलवर भेट देऊन कौतुक केले तसेच मा.आमदार शिरीष चौधरी यांनी स्वतः स्टॉलवर पाणीवाटप करुन दिपाली गृप्स च्या सामाजिक कार्यात हातभार लावला.यशस्वीतेसाठी खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,श्री.देवेंद झोपे सर, संदिप पाटील,नाझीम शेख, एहसान कुरेशी इ.नी परिश्रम घेतले.