फैजपूर- सालाबादाप्रमाणे यंदाही मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत कार्तिकी पौर्णिमेला सोमवारी सकाळी रामप्रहरी फैजपूर शहरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभातफेरी काढण्यात आली.संतपंथ मंदिर फैजपूर येथून सुरुवात होऊन, हनुमान मंदिर, खुशाल भाऊ रोड,राम मंदिर, विठ्ठल मंदिर,रथ गल्ली रोड,लक्कड पेठ, कालिकामाता मंदिर, हनुमान मंदिर मार्गे पुन्हा संतपंथ मंदिर येथे आरती करुन सांगता करण्यात आली.यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी प्रभातफेरीचे नेतृत्व व सहभागी भक्तांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रभातफेरी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या तसेच नागरीकांकडून प्रभातफेरीतील सहभागी संत व सेवकांचे औक्षण करण्यात आले.याप्रसंगी जागांवरील कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दुर होवो व सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होवो अशी प्रार्थना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केली.