फैजपूर येथील आदिवासी-मुस्लिम गोसेवक रशिद तडवी यांनी केले गाईचे विधिवत अंत्यसंस्कार

0

फैजपूर प्रतिनिधी : मुक्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्माचे बंधन नसते तर असावी लागते ती प्रामाणिक इच्छाशक्ती व प्राण्यांविषयी चे प्रेम.याचाच प्रत्यय फैजपूर शहरवासीयांना आला आहे.        फैजपूर येथील मुस्लीम-तडवी समाजातील तरुण रशिद बाबू तडवी हे गेल्या अनेक वर्षांपासून गाईची सेवा करीत आहेत.फैजपूर परिसरात रशिद तडवी यांची गो-सेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.रशिद बाबू तडवी हे भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी शहराध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.  दि.६ जूलै रोजी गो-सेवक रशिद तडवी यांच्याकडील गाईचे निधन झाले, आपल्या लाडक्या गाईला ते घरातील एक सदस्य म्हणून जीव लावत असत.आणि काल या गाईचा मृत्यू झाल्याने रशिद तडवी यांनी गाईची विधिवत पूजा-अर्चा करुन अंत्यसंस्कार करुन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.यावेळी सतपंथ संस्थान चे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे देखील उपस्थित होते.त्यांनीदेखील गो-सेवक रशिद तडवी या तरुणाचे कौतुक केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे,ह.भ.प.प्रविणदास महाराज,प्रा.उमाकांत पाटील आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.