फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकारदिनी पत्रकार बांधवांचा सन्मान

0

फैजपूर प्रतिनिधी: मराठी पत्रकार दिनानिमित्त तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब यांच्या हस्ते शहर व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.पोलीस व जनतेत समन्वय साधून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकार महत्वाची भुमिका पार पाडत असतात आणि पोलीस व पत्रकार बांधवांमध्ये फैजपूर शहरात अतिशय चांगला समन्वय असुन नेहमी एकमेकांना सहकार्य करत असतात असे प्रतिपादन यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब यांनी केले.याप्रसंगी सर्व पत्रकार बांधवांना पेन,डायरी,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले होते, तसेच पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुख शेख, दैनिक जळगाव वृत्त विभागीय व्यवस्थापक संदिप पाटील, वासुदेव सरोदे, डॉ.राजेंद्र तायडे, समीर तडवी,सलीम पिंजारी,संजय सराफ,इदू पिंजारी,राजु तडवी, योगेश सोनवणे,कामील शेख, मयुर मेढे, शाकीर मिस्त्री,जावेद काझी,प्रेस फोटोग्राफर मिलिंद महाजन,वृत्तपत्र वितरक बंटी आंबेकर इ.पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.