फैजपूरात ५०० मास्कचे मोफत वाटप

0

फैजपूर । प्रतिनिधी

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत. वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत. साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता 30 ते 40 रुपये ला मिळू लागले आहेत. आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला मास्क वापरने खर्चिक वाटत होती. सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन नगरसेविका सायमा बी आबिद मलक व समाजसेवक शरीफ मलक यांनी स्वखर्चाने शहरातीक नागरिकांना, पोलीस व न. पा. कर्मचारी यांना 500 मास्क मोफत उपलब्ध करून दिले.  यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विजय पाचपोळे, इकबाल सैय्यद, समाजसेवक शरीफ मलक, सुनील वाढे, समाजसेवक जलील शेख, पत्रकार शाकिर मलक, आबिद मलक आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.