Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»फैजपूरातील स्टेट बँक शाखेचा मनमानी कारभार : ग्राहक त्रस्त
    जळगाव जिल्हा

    फैजपूरातील स्टेट बँक शाखेचा मनमानी कारभार : ग्राहक त्रस्त

    By May 8, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    फैजपूर । प्रतिनिधी, जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गोर गरीब, हातमजुरी करणारे हताश होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या जनधन खाते धारकांना प्रत्येकी ५०० रु. खाते धारकांच्या खात्यात वर्ग केलेले आहे. मात्र, येथील स्टेट बँक इंडिया शाखेत गेल्या अनेक दिवसापासून बँकेत मनमानी कारभार सुरु असून येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला जनता कंटाळली असून वरिष्ठांनी दखल घेऊन ठोस पावले उचललावे अशी मागणी शहरातून होत आहे.
    संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत. मात्र, खात्यात वर्ग झालेल्या ५०० रु. काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व बँकेतील कर्मचारी ग्राहकांना वेढीस धरत आहे. बँकेचे कामकाज कासव गतीने व त्यांच्या मनाप्रमाणे चालते. दररोज या बँकेत विड्रॉल असो अथवा पैसे भरायचे असो रांगेत तासनतास ग्राहकांना उभे राहावे लागते. त्यातच पुर्ण ग्राहक न करता मधातच जेवणाची सुट्टी म्हणून सर्व कर्मचारी आतमधल्या थंड हवेच्या रुममध्ये जातात. तासभर निघतच नाही तोपर्यंत ग्राहक कंटाळून बाहेर जातात.
    कर्मचारी मात्र दुपारी अडीच – तीन वाजताच गेटचे कुलूप लावून घेतात. तोपर्यंत बाहेरचा येणारा ग्राहक तळपत्या उन्हात जनावरांच्या कोंडवाड्यासमोर उभा राहील्यासारखा गेटवर उभा राहतो. मात्र बँकेचे कर्मचारी गेट उघडत नाही. ४५ डि.ग्री. सेल्सीयस पर्यंत उन्हाळा तापत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातुन आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी व आर्थीक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र, या बँकेचे कर्मचारी, अधिकारी आम्ही जनतेवर उपकारच करीत असल्याचा आव आणतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानीमुळे ग्राहकात चिड निर्माण होत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ठोस पावले उचललावे अशी मागणी शहरातून होत आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif