फैजपूर । येथे कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्या रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान जळगावातल्या मेहरूण भागात एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. यामुळे लोक थोडी जास्त काळजी घेऊ लागले आहेत. यातच सोमवारी रात्री फैजपूर येथील एका रूग्णाला कोरोनाच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत रूग्ण हा काही दिवसांपूर्वीच सूरत येथून आला होता. गत तीन दिवसांपासून त्याला ताप असून काही लक्षणे ही कोरोनाच्या संसर्गासारखी दिसत असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले असून तेथे त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.