Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    • बोदवडमध्ये गुंडगिरीविरोधात जनक्षोभाचा उद्रेक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»फैजपुर येथे रस्ता रोको आंदोलन; मोदी- योगी सरकारचा निषेध
    कृषी

    फैजपुर येथे रस्ता रोको आंदोलन; मोदी- योगी सरकारचा निषेध

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे रविवारी घडलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतले. तसेच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची हाकलपट्टी करून त्यांच्या मुलाला अटक करावी. अशा या मागणी साठी यावल – फैजपूर काँग्रेसच्या वतीने येथील सुभाष चौकात सकाळी दहाच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको आंदोलन चे नेतृत्व आमदार शिरीष दादा चौधरी यांनी केले.

    लखीमपुर खेरी येथे रविवारी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष  मिश्रा यांच्या वाहनाने काही शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, त्यात आशिष मिश्राने गोळीबार केला.  त्यात एक शेतकरी तिथेच गतप्राण झाला, त्यानंतर आक्रमक झालेल्या दंगलीत सात ते आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करत ताब्यात घेतले या निषेधार्थ यावल व फैजपूर काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाचा व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला.  ‘मोदी सरकार, योगी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

    केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिरीष दादा चौधरी, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, नगरसेवक केतन भाऊ किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक तथा गटनेते कलीम रवा  मण्यार, शेतकी संघ चेअरमन सुनील फिरके, यावल शहर प्रमुख कादिर खान, फैजपुर शहर प्रमुख शेख रियाज, पं. स. सदस्य सरफराज तडवी, पं. स. सदस्या कलीमा तडवी, जेष्ठ व माजी कार्यकर्ते ओंकार वामन सराफ, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, युवा शहर अध्यक्ष वसीम महेबुब  तडवी, सेवादल काँग्रेसचे कमिटीचे भरत कुंवर, चंद्रशेखर दादा  चौधरी, लियाकत अली, मुख्याध्यापक गणेश गुरव, योगेश भावसार,  संजय गांधी निराधार योजनेचे जावेद जनाब, रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम जनाब, रामराव मोरे, आमोदा माजी सरपंच राजेंद्र पाटील, किरण निंबाळे, इरफान खान, हर्षल दाणी, पिंटू हंसकर, चंद्रकला इंगळे, सीमा गुरव, पुष्पा झाल्टे, ललिता चौधरी, अमोल भिरुड, आसिफ मेकॅनिकल, झीया सर, यासह यावल – फैजपूर परिसरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif