भुसावळ (प्रतिनिधी) :
फैजपूर येथे आजीसोबत नातेवाईकांच्या उपचारासाठी गेलेल्या एका पाच वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. विशाखा दीपक चव्हाण (वय-5) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. विषाखा ही कुरकुरे घेऊन दुकानातून निघाली असता ट्रकच्या चाकाखाली येवून तिचा जागीच मृत्यू झाला.
यावल रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर डॉ. खाचच्या दवाखान्याजवळ ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
विशाखा तिची आजी कल्पना प्रदीप भालेराव, रा. भुसावळ यांच्यासोबत फैजपूर येथे नातेवाईकांच्या उपचारासाठी गेली होती. यावेळी आजीजवळून पैसे घेऊन कुरकुरे आणण्यासाठी गेलेली विशाखा दुकानातून कुरकुरे घेऊन निघाली असता समोरून आलेल्या भरधाव ट्रक एमपी 09 एच र्ऐं 1733 खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
यापकरणी ट्रकचालक प्रभू कालू सिंग, रा.लाखनकोट, जि.दहाट, मध्यप्रदेश यास फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रकमध्ये रासायनीक खतांच्या गोण्या होत्या. पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.