Friday, September 30, 2022

फेरमुल्यांकनाच्या निषेधार्थ आरपीआयचे मनपासमोर आंदोलन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

फेरमुल्यांकनाच्या निषेधार्थ आरपीआयतर्फे मनपासमोर आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने एक शासन निर्णय काढून मालमत्तेचे सर्वेक्षण करून फेरमुल्यांकन करण्याचे नोटीस दिल्या असून या निर्णयाचे निषेध करण्यासाठी तसेच कोरोनाच्या जागतिक महामारीत चालू घरपट्टी मध्ये 50 % सुट सर्वसामान्य नागरिकांना द्यावी, या  मागणीसाठी  आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने  महानगर पालिकासमोर आंदोलन करण्यात आले.

शहरात कोणतीही स्वच्छता नाही, चांगल्या शाळा नाही, गटारीची रोज साफ सफाई नाही, रोडाचे असे हाल झाले की न सांगिलेल बरे, या सर्व सुख सुविधांचा  अभाव असतांना सर्वसामान्य जळगावकर परेशान आहेत. अशातच महानगरपालिका प्रशासन जनतेच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या