अमळनेर, दि. 30 –
येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे लायनेस क्लब यांच्या सौजन्याने व लायनेस क्लब च्या मल्टिपल ऑफीसर जॅस्मिन भरुचा यांच्या सहकार्याने सॅनेटरी नॅपकिन डीसपोजल यंत्राचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या भदाणे मॅडम यांनी केले. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व स्वच्छतेचा बाबतीत महत्वाचे, दीर्घकाळ टिकणारे यंत्र बसवून यापुढे त्याचा सातत्याने उपयोग केला जाणार आहे. सदर कार्यक्रमास लायनेस क्लबच्या अध्यक्षा नवसारीकर मॅडम, सेक्रेटरी नम्रता अग्रवाल, ऑल इंडिया क्लबच्या व्हॉइस चेअरमन मंजिरी कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. मुलींचे आरोग्य व विविध समस्या यावर सविस्तर असे मार्गदर्शन डॉ. कुळकर्णी यांनी केले.


