वरणगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील फुलगाव येथे सकाळी किरकोळ कारणावरूण झालेल्या वादात चाकु हल्यात तरुण गभीर जखमी झाल्याची घटना घडली. या बाबत असे कि फुलगाव येथील शिवराय चौकात सकाळी ८ . ३० वाजेच्या सुमारास भुषण दिवाकर महाजन ( २० ) यांचे व सागर विजय पाटील या दोघात किरकोळ कारणावरूण वाद झाल्याने हाणामारी होऊन सागर पाटील याने भुषण महाजन याच्यावर चाकु हल्ला करीत जखमी केले जखमीस तातकाळ वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करूण उपचारा साठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. या बाबत जखमीच्या फिर्यादीवरूण वरणगाव पोलीसात आरोपी विरोधात भा द वी कलम ३२४ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील करीत आहे.