Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»फसवणूक व अवैध सावकारीच्या जाचामुळे प्रौढाची आत्महत्या; गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    फसवणूक व अवैध सावकारीच्या जाचामुळे प्रौढाची आत्महत्या; गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 9, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    शहरातील प्रौढाने  शेतजमीन खरेदीत फसवणूक करून अवैध सावकारीच्या जाचातून अवाजवी वसुली केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या कारणावरून दोघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील  नागसेन नगरातील रहिवासी सुकलाल लक्ष्मण घोडके (वय ४५) यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. फेब्रुवारीत प्रौढाने लिहीलेली सुसाइड नोट त्याच्या पत्नीस मिळाली. तर या सुसाइड नोटच्या आधारावर रविवारी त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    मृत घोडके यांच्या आईच्या नावावर धानवड येथे २ हेक्टर ३२ आर क्षेत्रफळ असलेली जमीन आहे. ५ एप्रिल २०१८ रोजी ही जमीन खरेदी करण्यासाठी दलाल प्रकाश सुपडू माळी यांनी घोडके कुटुंबीयांना संपर्क केला. त्यानुसार शैलेंद्र वसंत चिरमाडे हे जमीन खरेदी करण्यास तयार झाले. ही जमीन ५ लाख ७५ हजार रुपयांत खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार सौदापावती करण्यात आली. सुरूवातीला २ लाख रुपये द्यायचे व उर्वरीत ३ लाख ७५ हजार रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले होते.

    चिरमाडे व माळी यांनी काही दिवसांनी घोडके यांच्या आईस केवळ ५० हजार रुपये दिले. जमीन खरेदीसाठी शासनाच्या परवानगीची गरज आहे. परवानगी घेण्यासाठी खर्च येणार असून तो आम्ही करु. झालेला खर्च मूळ रकमेतून कमी करुन तुम्हाला देऊ असे दोघांनी सांगीतले. परंतु, सौदापावती करताना अशी कोणतीही अट घातलेली नव्हती. यानंतर माळी व चिरमाडे यांनी जमीन खरेदीसाठी घोडके यांच्याकडे तगादा लावला. जमीन लवकर खरेदी करुन द्या, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू अशा धमक्या दोघांनी घोडके यांना दिल्या.

    माळी आणि चिरमाडे यांनी दिलेल्या धमक्यांमुळे घोडके तणावात राहत होते. त्यांनी पत्नी शोभा व मुलगा हर्षल यांना देखील ही बाब सांगीतली होती. त्रास वाढल्यानंतर घोडके यांनी आत्महत्या केली. यानंतर फेब्रुवारीत त्यांच्या पत्नी शोभा यांनी घराची सफाई केली असता घोडके यांच्या शर्टच्या खिशातून एक सुसाइड नोट त्यांना मिळून आली आहे. यात त्यांनी याबाबतची माहिती लिहून ठेवली आहे. दरम्यान, मयत घोडके यांच्या वडीलांचे सन २०१६ मध्ये निधन झाले आहे. यावेळी त्यांनी माळी याच्याकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले. वेळेत पैसे न देऊ शकल्यामुळे त्याने घोडकेंकडून तब्बल सव्वा लाख रुपये घेतले आहेत. असाही उल्लेख दाखल फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

    शोभा घोडके यांनी यासंदर्भात  दिलेल्या फिर्यादीवरुन चिरमाडे व माळी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    crime news jalgaon news latest news Sucide Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif