पारोळा | प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली,
याबाबत अधिक माहिती अशी की भोकरबारी येथील सीमा संभाजी पाटील यांना तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगत माझा मुलगा पोलीस खात्यात मोठ्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहे, मी तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सीमा संभाजी पाटील यांच्या घरी येऊन कांतीलाल छगन चौधरी, रा, झामी चौक अमळनेर व मनीषा अंबादास सोनवणे यांच्या सह अजुन एक जण यांनी सीमा संभाजी पाटील यांच्या कडून पंचवीस हजार रुपये रोख व पाच चांदीचे नाणे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सीमा संभाजी पाटील यांनी फिर्याद दिल्या वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणी कांतीलाल छगन चौधरी व मनीषा सोनवणे याना अटक करून पारोळा येथील कोर्टात बुधवारी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीआली आहे.

