फरार विजय मल्ल्याची लवकरचं ‘घरवापसी’; मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये होणार रवानगी

0

मुंबई । भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे त्याला लंडनहून थेट मुंबईत आणण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते. रात्री मुंबईत पोहोचल्यानंतर काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी न्यायालयात हजर करण्यात येईल.

ब्रिटनमधील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार भारत सरकारने त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत त्याला ब्रिटनहून भारतात आणलं पाहिजे. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याला आता कधीही भारतात आणलं जाणार आहे.

विजय मल्ल्याला मुंबईत आणल्यानंतर वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे. सीबीआय आणि ईडीचे अधिकारी विजय मल्ल्यासोबत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर थेट कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. तसेच त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.