फरकांडे येथे पुन्हा हिंस्र ; प्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार

0

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : फरकांडे येथे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान जानफळ शिवारात भीमराव आनंदा पाटील यांच्या शेतात गोठ्याबाहेर बांधलेले म्हशीचे पारडू  अज्ञात हिंस्र पशूने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आधी गायीच्या वासरावर ह्या प्राण्याने वार केल्याने वासरू जखमी केले आहे परिसरात देविदास पाटील, सुरेश पवार  आदी शेतकऱ्याचे पारडू या हिंस्र प्राण्याने ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभाने याबाबत दखल घेऊन हिंस्र प्राण्याचा बंदवस्त करण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.