पारोळा प्रतिनिधी – एरंडोल येथुन जवळच असलेल्या फरकांडे येथील CRPF केंद्रीय राखीव दलाचे जवान अरुण दिलीप पाटील यांना आपल्या कर्तव्यावर सेवा बजावल्याने डि.जी पदक व प्रशस्तीपत्र भेट ..
सविस्तर माहिती असी की दि.३१ जानेवारी २०२० रोजी जम्मू काश्मीर येथील हायवे क्रमांक ४४ वरील बन प्लाझा येथे रात्री ९ वाजता टोल प्लाझा येथे जम्मु पासिंग ची ट्रक आली असता. ती ट्रकचेक करण्यासाठी तेथील जम्मूकाश्मीर पोलिस ट्रक चेक करण्यासाठी गेला असता ट्रक मधील पाचही आतंकवाद्यांनी गोळीबार केला. व जे & के पोलीस हे जखमी झाले . गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू येताच गस्तीवरील CRPF जवान टोल प्लाझा येथे धावले. व आमच्यावरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिले व आम्हाला सूचना दिल्या त्यांना बघून आतंकवादिंनी आतंकवाद्यांनी त्यांच्यावरही फायरिंग सुरू केली . ते सावधानता बाळगून होते म्हणून बचावले टोल प्लाझा येथे.रात्री दिड तासाच्या चकमकीत आतंकवादी गॅसबॉम्ब चा वापर करून जंगलात पळ . काढला CRPF च्या जवानांन सोबत असलेले फरकांडे येथील कॉ. अरुण दिलिप पाटील. यांनी आपल्या साथीदारांसोबत जीव मुठीत धरून आतंकवादयांच्या मागे धावून गोळीबार करत १ आतंकवादी जागेवर ठार केला. व दुसरा जखमी झाला. त्यातील ३ आतंकवादी जंगलात पळून गेले असता.जवळील CRPF ची दुसरी तुकडीही तेथे आली. व दोघे तुकडीचे जवान मिळून रात्रभर सर्च ऑपरेशन करून सकाळी १० वाजता तीघेही आतंकवादी सापडले . त्यात२ जिवंत एक १ सर्च ऑपरेशन दरम्यान गोळीबारात मारला गेला. असल्याची माहिती मिळाली.
हे ऑपरेशन यशस्वी केल्याने
तर दि.१ फेब्रुवारी २०२० रोजी जम्मूकाश्मीर येथील CRPF चे महानिदेशक डॉ. ए. पी.माहेश्वरी यांनी अरुण पाटील यांना डि.जी बॅच व प्रशंसापत्र देऊन गौरविले .
अरुण पाटील सन २००७ मध्ये CRPF मध्ये रूजू झाले होते. १३ वर्षाच्या कारकिर्दीत अरुण पाटील यांच्यावर तिसऱ्यांदा हा प्रसंग आला असून.सन. २०११ – व २०१२ मध्ये छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते त्यावेळी आंतरीक सुरक्षा पदक व प्रशस्ती पत्रक देण्यात आले होते… ते फरकांडे येथील दिलीप पाटील यांचे चिरंजीव आहेत, डॉ. शरद पाटील यांचे भाऊ आहे.
तर त्यांचा एक भाऊ राज्य राखीव पोलीस दलात आहेतर , बहीण DYSP म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे.