मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. फडणवीस थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवणार आहेत. या वेगवान घडामोडींनंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची सायंकाळी साडेसहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.