फडणवीस,महाजनांनी माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपाला गिरिश महाजनांच प्रत्युत्तर…म्हणाले

0

जळगाव : स्वतःच्या राजकारणासाठी विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही, त्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा गौप्यस्फोट असा गौप्यस्फोट माजी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. दरम्यान, खडसेंच्या आरोपांना गिरिश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.

नाथाभाऊंना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आम्ही असा कुठलाही विरोध आम्ही केला नाही, असं मत गिरिश महाजन यांनी व्यक्त केलं राज्यात इतरही मंत्र्यांचे तिकीट कापले गेले. हा तिकिट कापण्याचा निर्णय केंद्रीय कमिटीचा होता. येथे उगाच कुणीतरी सांगितलं याला अर्थ नाही. याबाबत मी नाथाभाऊंशी बोलेन.”

एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांची निश्चित चौकशी झाली पाहिजे. चौकशीत कोण दोषी आहे स्पष्ट होईल. मात्र, आम्ही याबाबत काहीही बोललेलो नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. तिकिटाचे सर्व निर्णय केंद्रीय निवड समितीचे होते, असंही गिरिश महाजन यांनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.