धरणगाव :-येथील पी आर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय छात्र सेने चे विद्यार्थी,शालेय विद्यार्थी,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील छात्र सेनेचे विद्यार्थी याच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरा करण्यात आला. योग शिक्षक गोपाल चौधरी यांनी विविध योगासने,योगाचे महत्व व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रा बी एन चौधरी, धनराज चौधरी यांनी ही आरोग्य आणि योग याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने प्राणायाम केला शिवाय यापुढे दररोज एक तास योगा व प्राणायाम यासाठी देणार असल्याचं संकल्प योग शिक्षक गोपाल चौधरी यांना शपथ पूर्वक सांगितला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक संजय अमृतकर, पर्यवेक्षक डॉ संजीवकुमार सोनवणे, मेजर डॉ अरुण वळवी,चीफ ऑफिसर डी एस पाटील, बी सी कोळी,निरज शिंदे,रामचंद्र धनगर,रवींद्र पाटील,संजय मोरे,राजेश खैरे, सौ सुरेखा तावडे,सौ वंदना सोनवणे, डी के चौधरी,चंद्रकांत शिरसाठ, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम याशवितेसाठी प्रविण तिवारी,श्री पवार, नितीन बडगुजर, यशवंत पाटील ,मनोज परदेशी आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रस्ताविक डी एस पाटील यांनी तर आभार ए डी वळवी यांनी मानले
.