Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»प्रेयसीची हत्या करून घरच्या भिंतीत पुरला मृतदेह; मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
    गुन्हे वार्ता

    प्रेयसीची हत्या करून घरच्या भिंतीत पुरला मृतदेह; मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले

    By January 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालघर : पालघरमध्ये एका तरुणाने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत तीन महिने लपवून ठेवल्याची पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून निघून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही बाब उघड झाली आहे. वाणगावमधील वृंदावन या सदनिकेल्या एका फ्लॅटच्या भिंतीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

     

    चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यासाठी घरातून निघून गेली, मात्र ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. या चार महिन्याच्या काळात तरुणीचा प्रियकर तिचे सोशल मीडिया वापरत होता. तसेच व्हॉट्सअॅपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचे भासवून संपर्कात होता. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

     

    या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रियकराने धक्कादायक कबुली दिली. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याचे प्रियकराने पोलिसांना सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केले. शिवाय तो याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून भाड्याने राहात होता. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026

    आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.