Saturday, October 1, 2022

प्रेमी युगुलाची नदीत उडी घेत आत्महत्या; तरुणाचा मृत्यू तर तरुणी बचावली

- Advertisement -

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत आज शनिवारी सकाळी प्रेमी युगुलाने उडी मारली. यात युवकाचा मृत्यू झाला तर युवतीला पट्टीच्या पोहणार्‍यांनी तातडीने बाहेर काढल्याने ती बचावली.

- Advertisement -

- Advertisement -

अमोल किशोर कोतकर (वय 31, रा.वारूळ-पाष्टे ता.शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव असून प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर सोबत राहणे शक्य होणार नसल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

अमोल कोतकर याचे शिरपूर फाट्यावर आशापुरी स्पेअर पार्टस् हे दुकान आहे. त्याचे येवला येथील तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणीचे माहेर मालेगाव (जि.नाशिक) येथील असून सासर नाशिक येथील आहे. दोघेही नातलग असून काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेम फुलत गेल्याने त्याची कुणकूण तरुणीच्या सासरच्या लोकांना लागली. त्यांनी चौकशी करुन अमोल कोतकरशी तिचे संबंध असल्याचे हुडकून काढले.

15 ऑक्टोबरला तरुणीला घेवून सासरचे कुटूंब धुळे येथे पोहचले. अमोल कोतकरलाही बोलावण्यात आले. तुमचे प्रेमसंबंध असतील तर घटस्फोट देऊन अमोलसोबत जा असे सासरच्या लोकांनी त्या तरुणीला सांगितले. मात्र तिच्या आईने घटस्फोटाला नकार दिला. अखेर दोन्ही बाजूंचे लोक नरडाणा येथे गेले. तेथे अमोलच्या कुटुंबाशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर तरुणीला घेऊन अमोल शिरपूरला निघून गेला.

शनिवारी सकाळी अमोल व तरुणी आत्महत्या करण्याच्या हेतूने सावळदे येथे पोहचले. तेथील पुलावर पोहचल्यावर त्यांनी बाहेरगावी जाऊन एकत्र राहू असा विचार केला. तेथून दोघेही परत शिरपूरला आले. मात्र दोघेही विवाहित असल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतील, त्यापेक्षा मरण बरे अशा विचाराने ते पुन्हा सावळदे येथे पोहचले. सकाळी नऊला दोघांनी हातात हात घेऊन पुलावरुन उडी टाकली. त्याचवेळी नदीपात्रात सावळदे येथील पट्टीचे पोहणारे 15 ऑक्टोबरला बुडालेल्या युवकाचा शोध घेत होते. त्यांच्यापासून काही अंतरावरच दोघे पाण्यात पडले. लागलीच धाव घेवून दर्शनाला जिवंत बाहेर काढण्यात संबंधितांना यश आले.

मात्र अमोल उडी टाकल्यानंतर थेट तळाशी गेल्याने त्याचा शोध लागू शकला नाही. तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत यांनी मदतकार्य केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या