प्राचार्य डॉ. प्र.श्रा.चौधरी यांचे निधन

0

खान्देश शिक्षण-साहित्य क्षेत्रावर शोककळा

जळगाव । प्रतिनिधी

खान्देशातील शिक्षण क्षेत्रातील एक प्रगल्भ व्यक्तीमत्व, साहित्य क्षेत्रातील पितामह आणि बालसाहित्यातील दिग्गज असे माजी प्राचार्य डाॅ.प्र.श्रा.चौधरी यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण, साहित्य, ग्रंथालय आणि संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली असून एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
प्राचार्य डॉ.चौधरी यांचा जन्म दिनांक ५ डिसेंबर १९३९ सांगवी (ता.यावल जि. जळगाव) येथे झाला होता त्यांचे शिक्षण एम.ए., एम.एड., पी.एच.डि असे होते. त्यांनी छत्तीस वर्षे शिक्षक, प्राध्यापक, आणि प्राचार्य अशी शिक्षणक्षेत्रात सेवा दिली. शिक्षण, साहित्य आणि ग्रंथालय हे त्यांचे आवडीचे कार्यक्षेत्र होते. ते पुणे व उ.म.वि.त एम.फिल व पी.एच.डी. पदवीसाठी संशोधक मार्गदर्शक होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १७ विद्यार्थ्यांना पी.एच.डीचे मार्गदर्शन व ३ विद्यार्थ्यांना एम.फिल पदवी प्राप्त झाली आहे. ते विविध विद्यापीठातील ४ एम.फिल व २१ पी.एच.डी. शोध प्रबंधाचे परीक्षक होते. त्यांचे शैक्षणिक, साहित्यविषयक, वैचारिक आणि इतर असे एकूण जवळपास अडीचशे लेख प्रकाशित झाले आहेत. सरांनी १६ पुस्तकांना प्स्तावना लिहली आहे.
विविध दैनिकात त्यांनी लिहिलेल्या लेखन मालिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यात…… चिंतन, विचारपुष्प, ••• तुका म्हणे, सद्गुणांच्या गोष्टी, बोधकथा, •••तुकोबाची अमृतवाणी, नित्य नवा दिस जागृतीचा, कथा: आमची-तुमची, संस्कार दीप, ••• फुल आणि सुगंध, संस्कार कथा, संस्कार धन, ••• बोल अंतरीचे यांचा समावेश आहे.
प्राचार्य डॉ.चौधरी यांनी अनेक नवोदित लेखक, कवींना प्रोत्साहन देवून साहित्य क्षेत्रात उभं केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.