प्रहार विशेष शिक्षक संघटनेच्या विभागिय अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे

0

– जिल्हाध्यक्षपदी चेतन निकम यांची निवड

पाचोरा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी आ.बच्चुभाउ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षक वकर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेच्या नाशिक विभागिय अध्यक्षपदी भडगाव येथिल विशेष शिक्षक मिलिंद भास्कर सोनवणे यांची तर जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव येथिल विशेष शिक्षक चेतन निकम व शरद कोळी यांची नुकतिच निवड करण्यात आली.

महाराष्टाच्या शिक्षण क्षेञात समग्र शिक्षा अभियानांतर्गत सलग १५ वर्षांपासुन मानधन तत्वावर कंञाटी स्वरूपात विशेष शिक्षक, समावेशित, विषय तज्ञ, विषय साधन व्यक्ती, डाटा एंट्री आॅपरेटर, रोखपाल, एम. आय. एस.काॅर्डीनेटर, कनिष्ठ अभियंता यासारख्या विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या राज्यकार्यकारची बैठक नुकतिच संपन्न झाली. प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष आमरावती येथिल रणजित देशमुख यांनी राज्याची कार्यकारणी संघटित केली यात नाशिक विभागाची धुरा भडगाव जि. जळगाव येथील विशेष शिक्षक मिलिंद भास्कर सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली.यांच्यासोबतच नाशिक विभागासाठी धुळे येथील संजय काळमेघ व नंदुरबार येथिल शेखर पाटिल यांनाहीविभागाची जबाबदारी दिली आहे. राज्याध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचे आदेश दिल्याने जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी जळगाव येथिल विशेष शिक्षक चेतन निकम यांची निवड करण्यात आली त्यांच्यासोबत जळगाव मनपाचे शरद कोळी यांचीही जळगाव जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडिबद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

“समग्र शिक्षा अभियानातिल कंञाटी कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या प्रहार संघटनेची विभागिय अध्यक्षपदाची धुरा सांभाळतांना आमचे नेते शालेयमंञी बच्चु कडु यांचे मार्गदर्शनाखाली संघटनेचे विचार सर्वांपर्यंत पोहचण्याचे काम करण्यासोबतच नाशिक विभागातिल कर्मचार्‍यांच्या न्याय हक्क व समस्यांसाठी धुळे येथील संजय काळमेघे व नंदुबार येथिल शेखर पाटिल यांच्या सोबतिने सदैव प्रयत्नशिल राहु.

नाशिक विभागिय अध्यक्ष – मिलिंद भास्कर सोनवणे

 

“संघटनेच्या वरिष्ठांनी ज्या विश्वासाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपवली आहे त्याला तडा जाउ देणार नाही. जळगाव महानगर पालिकेचे शदर कोळी यांच्या सोबत जिल्ह्याची कार्यकारणी जाहिर करून संघटनेच्या कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देउ अशी ग्वाही देतो.

– जळगांव जिल्हा अध्यक्ष चेतन निकम

Leave A Reply

Your email address will not be published.