प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटनेच्या प्रयत्नांना यश

0

भडगाव प्रतिनिधी

प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटना मुबंई -11 राज्य संघटनेच्या राज्यध्यक्ष रविंद्र सोनवणे व राज्य कोषाध्याक्ष पांडुरंग भोर,राज्य सचिव काशिनाथ राउत यांनी नुकतेच अनलॉकच्या पुढील काळात दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना शासकीय कार्यालयात सवलत मिळावी यासाठी मा.सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनजंय मुंडे यांच्याशी पत्र व्यवहार केल्यानंतर यात सर्व दिव्यांग कर्मचारी व अधिकारी यांना वाहतूक व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सूट देण्यात आलेली आहे.दिव्यांग व्यकतीची रोगप्रतिकार शक्तीचा अभाव जाणवत असल्यामुळे सूट देण्यात यावी .अशी मागणी प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटना मुबंई -11 राज्य संघटनेच्या राज्यध्यक्ष रविंद्र सोनवणे व राज्य कोषाध्याक्ष पांडुरंग भोर, राज्य सचिव काशिनाथ राउत, यांनी केली होती. कोरोना (COVID-19) काळात शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी व अधिकारी यांची हजेरी 100 टक्के बंधनकारक करण्यात आलेली आहे.परंतु वाहतुकीच्या सुविधा सुरळीत नाही यामुळे ही सूट देण्यात आलेली आहे. प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटना मुबंई -11 राज्य संघटनेच्या राज्यध्यक्ष रविंद्र सोनवणे व राज्य कोषाध्याक्ष पांडुरंग भोर ,राज्य सचिव काशिनाथ राउत यांनी मा.सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनजंय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.