Sunday, May 29, 2022

प्रहार जनशक्ती पक्ष यावल नगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

यावल पालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष सर्व जागा लढविणार असल्याची माहिती  प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी शहरातील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

अनिल चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शहरांचा विकास झालेला असताना यावल शहराचा विकास झाला नाही. अर्थात त्यामागे स्वार्थी राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले. यावल पालिकेच्या आगामी निवडणुकीत आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संपूर्ण २१ उमेदवार रिंगणात ताकदिनिशी उतरवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावल शहराची विकासाच्या बाबतीत पिछेहाट

अनिल चौधरी म्हणाले की, यावल शहर वगळता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांचा विकास झाला.  यावल मात्र विकासाच्या बाबतीत मागे राहिले . यामागे स्वार्थी राजकारण हेच मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले.  बहुमताने नगराध्यक्ष बनवायचा व सोबतच्या नगरसेवकांनी सोईस्कररीत्या कामे करून पैसा कमवायचा व स्वत च्या संपत्तीत वाढ करायची ? असा आरोपही त्यांनी केला जनशक्ती पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार असल्याचे सांगून नवनियुक्त नवनिर्वाचित नगरसेवकोना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले .

तसेच चौधरी म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह अमळनेर, भुसावळ, फैजपुर,  रावेर, यावल येथील नगरपालिका निवडणुक ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लढविली जाणार आहे.  विकासाचे व्हिजन समोर ठेवुन आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात पुर्ण ताकदिनीशी लढणार असल्याचे ते म्हणाले पत्रकार परिषदप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख शेख अलीम, उपनगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी, शहरध्यक्ष तुकाराम बारी,  मो. हकीम, गोकुळ कोळी,  तनविर मन्यार, सुभाष सोनवणे,  उमर कच्छी, रफीक शेख, शेख शकील, हाजी हाकीम खाटीक, नितीन कोळी, रफीक टेलर,  शेख मजर, शेख निजान, युनुस खन्ना, सागर चौधरी, आसीफ खान आदींची उपस्थिती होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या