Sunday, May 29, 2022

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ येथील  प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर काल दि. ७ डिसें. रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे.  या घटनेमुळे भुसावळ शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

भुसावळ येथील  दिपनगर नजीक हॉटेल सरगम जवळ महामार्गालगत मंगळवारच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महेश पटेल यांच्यावर हल्ला केला आहे. जखमी पटेल यांना वैद्यकीय उपचारार्थ सुरुवातीला ट्रामा केअर व नंतर साईपुष्प हॉस्पीटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे.

विजय कैलास सोनवणे आणि महेश पटेल हे दोघे जण बुलेटने जात असतांना संतोष विश्वनाथ भगत याने दारुच्या नशेत दोघांना अडवले. तुला बघून घेईन तुझ्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत संतोष भगत याने महेश पटेल यांच्यावर कोणत्यातरी शस्त्राने हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले.

घटनेचे वृत्त समजताच पो.नि. विलास शेंडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गु.र.न. 196/21 भा.द.वि. 324, 341, 504, 506, 510, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या