नवी दिल्ली :- प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचे नवी दिल्ली येथे मंगळवारी रात्री एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ९३ वर्षाचे होते. नामवर सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात दुपारी स्मशानघाटात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 ला वाराणसीतल्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्यानंतर कौशल्याच्या जोरावर हिंदी साहित्यमध्ये पीएचडी मिळवली. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले. 1959 मध्ये त्यांनी चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
नामवर सिंह यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या
नामवर सिंह यांनी डझनांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. कविताचे नवीन प्रतिमान(1968), छायावाद(1955), दुसरी परंपरा की खोज(1982) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), वाद विवाद आणि संवाद(1989) यांसारख्या कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिल्या.