सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांतर्फे प्रचार शिगेला पोहोचलाय. एप्रिल महिन्यातील उन्हाने अंगाची लाही लाही होत असून पाणी टंचाईमुळे दुष्काळाची दाहकता आणि वाढत आहे. अशात गेले तीन दिवस जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटा व वादळाने थैमान घातले. काही ठिकाणी गारांचा तडाखा बसला. त्याचा परिणाम केळी, बाजरी, मका, कांदा आदि पिकांचे काही भागात मोठे नुकसान झाले. अंब्याच्या कैर्याा जमिनीवर पहल्या. लिंबांच्या झाडांचे नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील हातेड, मालखेडा, भार्डू, मराठे या गावात तब्बल 4 मिनिटे सुपारी एवढ्या मोठ्या गारा पडल्या. चोपडा तालुक्यातील मराठे येथे एक इसम वीज पडून जखमी झाला तर चोपडा येथे विज पडल्यो एक म्हैस दगावली. चोपडा, धरणगाव, रावेर, चाळीसगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.
तापमान 42 अंशाचे पुढे सरकले असतांना ऐन उन्हाळ्याात शेतकर्याांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी गुंतले असल्यामुळे शेतकर्याांच्या नुकसानीचे पंचनामा करण्यास कोणी फिरकत नाही. गेल्या तीन दिवसानंतर आज चौथा दिवस उगवला तर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या कामीत सापडला आहे. निसर्गाच्या कोपामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आता ति नुकसान भरपाई शासनाकडून मिळणेसाठी अधिकार्याांऐवजी पंचनामे होत नाहीत. नेहमी शेतकरी या ना त्या कारणास्तव भरडला जातोय. आता लोकसभा निवडणूक ही त्याला कारणीभूत ठरली आहे. पंचनामे होत नसल्याबद्दल शासकीय कर्मचार्याांना सध्या दोषी धरता येणार नाही परंतु संकटात सापडलेल्या शेतकर्याांसाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी युद्ध पातळीवर पंचनामे कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ते जर केले नाही तर पंचनाम्या अभावी त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही.
संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर झाला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेला असला तरी दुष्काळी भागात शासनाच्यावतीने जे कार्य व्हायला हवे ते होत नाही. पिण्याच्या पाणी टंचाईवर उपाय योजना या पद्धतीने व्हायला हवी ती होत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर जळगाव शहरा नजिक असलेल्या असोदा गावात 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळते. तीच अवस्था जळगाव शहरालगत असलेल्या नशिराबाद या गावाची आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या नशिराबाद गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होतेय. यंदा दुष्काळ आहे म्हणून असोदा व नशिराबाद या गावात पाणीटंचाई आहे असे नाही प्रत्येक उन्हाळ्याात असोदा व नशिराबादकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. नेमेची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पाणीटंचाई या गावांना पाचवीला पुजलेली आहे. त्यासाठी या दोन्ही गावांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे शेळगाव बॅरेज हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर असोदा गावाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला असता परंतु गेल्या 25 वर्षापासून शेळगाव बॅरेज अर्धवट अवस्थेत पडून आहे.
जलसंपदा खात्याचे मंत्री जळगाव जिल्ह्याकडे गिरीश महाजन यांना मिळाल्यानंतर अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होतील अशी अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु जळगाव जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग झाला. एकही सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही ते जर झाले असते तर आज जळगाव जिल्ह्याची स्थिती वेगळीच राहिली असती. नशिराबादकरांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी वाघूर धरणातून आवर्तन सोडून पाणी द्यावे अशी त्याची मागणी असून ती त्यांची मागणी रास्त आहे. सध्या जळगाव ाहराला होणारा पाणी पुरवठा वाघूर धरणातूनच होतो. वाघूर धरणात फक्त 30 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने जळगाव शहरात दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड करण्यात आला आहे. अजून दोन महिने उन्हाळा बाकी आहे. मे मध्ये जळगावकरांना पाण्याची टंचाई जास्त जाणवले. कदाचित 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल तात्पर्य अस्मानी संकटावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असून शेतकर्याांना या संकटातून मुक्त करण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत जेणे करून शेतकर्याांचे अर्थशास्त्र सुधारले तर त्यांच्या होणार्याा आत्महत्येचे प्रमाण कमी होईल.