प्रवास करणं अधिक सोपं; आजपासून १० नवीन ट्रेन्स सुरू !

0

नवी दिल्ली : प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. या ट्रेन्सना ‘सेवा सर्व्हिस’ ट्रेन्स असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी (15 ऑक्टोबर) रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या सर्व ट्रेन्स या पॅसेंजर ट्रेन्स आहेत.

या मार्गावर धावणार

‘सेवा सर्व्हिस’ ट्रेन्समधील काही ट्रेन्स या दररोज तर काही ट्रेन्स आठवड्यातून सहा वेळा चालवण्यात येणार आहेत. दिल्ली आणि शामली, भुवनेश्वर आणि नारायणगड शहर, मुरकंगसेलेक आणि डिब्रूगड, कोटा आणि झालावाड, कोयंबत्तूर आणि पलानी दरम्यान रोज ट्रेन धावणार आहेत. वडनगर आणि महेसाणा, असारवा आणि हिंमतनगर, करूर आणि सलेम, यशवंतपूर आणि तुमुकूर, कोयंबत्तूर आणि पोल्लाची दरम्यान आठवड्यातून सहा वेळा ट्रेन्स चालवण्यात येणार आहे.

दरम्यान, रेल्वे एक नवीन वेळापत्रक तयार करणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्ली आणि शामली दरम्यान एक नवीन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली जंक्शनवरून सकाळी 8.40 मिनिटाला सुटेल तर सकाळी 11.50 मिनिटाला ती शामली येथे पोहचणार आहे. नवीन ट्रेन्समुळे प्रवाशांना प्रवास करणं अधिक सोपं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.