अमळनेर(प्रतिनिधी) : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र १ मधील पिंपळे नाल्या लगत असलेली धार-मारवड रोडवरील बंगाली फाईल भागातील अमरधाम आजच्या या समयी दिलासा दायक ठरत आहे.कोरोना महामारीच्या साथीने रोज १० ते १५ व्यक्तींचा मृत्यू होत असुन ताडेपूरा अमरधाम मध्ये जागा अपूरी पडत आहे. अश्या वेळेस अमळनेर नगरपालिका च्या लोकनियुक्त अध्यक्षा पुष्पलताताई साहेबराव पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव दादा तसेच प्रभागाच्या नगरसेविका शितल राजेंद्र यादव व माजी सैनिंक अण्णा मेजर यांच्या अथक प्रयत्नातुन नव्याने निर्माण केलेले अमरधाम लोकांच्या संकटाच्या वेळी कामात येत आहे.
आज साहेबराव दादांनी साफ सफाई चा आढावा घेत रस्त्यात येणारी काटेरी झाडे व अडथडे दूर करण्यासाठी JCP च्या साहाय्याने संपूर्ण अमरधाम परिसर स्वच्छ करून घेतला आहे.सोबतच लाईटचे खांब उभारून लाईटची व्यवस्था केली असून पाण्यासाठी हातपंप जोडून पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. प्रभागातील लोकांना प्रेत यात्रे साठी 3 ते ४ की.मी. दूर अंतरावर जावे लागत असे. आज क्रिडासंकुल च्या मागे बनलेले अमरधाम प्रभाग क्र १ च्या नागरिकांना दिलासा देणारे ठरले आहे तरी मिलचाळ,गलवाडे रोड, श्रध्दानगर,दाजिबा नगर येथिल नागरिकांना सुद्धा हे अमरधाम उपयोगी पडत आहे.जेसिबी चालक कमलेश पाटील,विजय पाटील यांनी मेहनत घेतली.
स्वतः हून साहेबराव दादांनी प्रभागातील विकास कामांची व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते बनवण्याची हमी घेतली आहे त्या दृष्टीने कामे सुरु आहेत.साहेबराव दादांनी दखल घेतल्याने प्रभागाच्या नगरसेविका शितल राजेंद्र यादव व अन्ना मेजर यांनी समाधान व्यक्त केले आहे.यामुळे नागरिकांची ऐन अंत्यसंस्कारावेळी होणारी फरफट आता थांबनार आहे.