पाचोरा : येथील हनुमान नगरमधील रहिवासी प्रभाकर श्रावण सोनवणे (६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाचोरा तालुक्यातील बाळद येथील मुळचे रहिवाशी असलेले प्रभाकर सोनवणे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. ते पेण तलाठी प्रेमदास सोनवणे व दै.’पुण्यनगरी’चे पत्रकार भास्कर सोनवणे यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ,एक बहिण, दोन मुले,एक मुलगी,जावई,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे..