प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

जळगाव :– प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-2025 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के व कमाल रु.10 लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी  वैयक्तिक लाभार्थ्यांचा जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एकुण 15 प्राप्त आहेत. त्यात सर्वसाधारण 14 व अनुसुचित जाती 1 अशाप्रकारे देण्यात आला आहे.

 

या योजनेअंतर्गत स्वंयसहाय्यता गट / शेतकरी उत्पादन  कंपनी / सहकारी उद्योजक संघ/ सहकारी उत्पादन संस्था / शासन यंत्रणा/ खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभुत सुविधा उद्देश वाहन (S.P.V)  यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी  ब्रँडींग व मार्केटींग / इन्क्युबेशन केंद्रामध्ये  समावेश करण्यात आला आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी / आपला अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी निवड केलेल्या संसाधन व्यक्तीव्दारे सादर करावयाचा  आहे. सदरील संसाधनव्यक्ती योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज मंजुरीस मदत करणे, उद्योग खात्याचे परवाने, आधार, जीएसटी नोंदणीसाठी मदत करतील. सदरील व्यक्ती शासकीय एजंट असुन त्यांना शासनाकडुन मानधन दिले जाणार आहे.

 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी निवड केलेल्या संसाधन व्यक्तीची नावे

प्रशांत आधार पाटील – 9404048912, हितेंद्र मंगा सोनवणे – 9579713739, राकेश संतोष काळे -7776858491, सागर मुरलीधर धनाड -9158045285, अजय भागवत पाटील -8275054393, नवनाथ संतराम पवार -8855810611, सचिन लिंबाजी धुमाळ -9404400555, श्रीमती.स्वाती सुदाम राठोड – 8855810611 असे असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.