प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तलाठी वर्गाकडून शेतकर्‍यांची पिळवणूक

0

जामनेर प्रतिनिधी दि, 24 –
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना शेतकर्‍यांन पर्यंत लवकरात लवकर पोहचविण्यासाठी राज्य सकार जोमाने काम करित आहे. जामनेर तालुक्यात दुष्काळ जाहिर झाला असून दुष्काळी तालुक्यात कर्जवसुली सह शेत सारा वसूल करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. तरी शेतकर्‍यांकडून तलाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी सक्तीने महसुल कर वसूल करुन तळेगावसह संपूर्ण तालुक्यात पिळवणूक केली जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना महसुल कराची सक्ती करु नये अशी चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.तरी संबंधित अधिकार्‍यांनी या कडे लक्ष देऊन शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
दुष्काळी निधी जमा करण्यासाठी शासकीय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला गतीने काम करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी केल्या आहेत. प्रथम दुष्काळी निधी याच महिन्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करा अशा सूचना तलाठी व इतर महसूल कर्मचार्‍यांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ वरिष्ठांनी दिले आहेत.
त्यादृष्टीने तलाठी मंडळी गावोगावी जाऊन सकाळीच यादी संबंधी कार्यवाहीसाठी पोहचत आहे.शेतकर्‍यांकडून यादीसंबध्दी सातबारा उतारा याबाबतचे गट क्रमांक,बँक पासबुक,आधार कार्डचे झेरॉक्स गोळा केली जात आहे.त्याआधी तलाठी सर्व शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करीत आहे तलाठी कार्यालयात यासाठी मोठी गर्दी जमत आहे परंतु ही कागदपत्रे स्वीकारण्यापूर्वी शेतसारा भरा असा प्रश्न केला जात आहे.
तळेगावसह तालुक्यात असे प्रकार सर्रास चालू आहे ज्या शेतकर्‍यांचे क्षेत्र चार ते पाच हेक्टर पर्यंत आहे त्यांना तीनशे ते चारशे रुपये भरावे लागत आहे दुष्काळी तालुक्यात कर्जवसुली सह शेत सारा वसूल करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत तरीसुद्धा शेतसारा वसुली करीत आहे असा मुद्दा शेतकरी करीत आहे.
यासंदर्भात जामनेर तालुक्यातील बर्‍याच गावांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली आहे हे वाद तालुक्यात अनेक ठिकाणी चालू आहे तरी संबंधित अधिकार्‍यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना लेखी आदेश देऊन शेतसारा वसुली करू नये अशा सूचना द्याव्यात असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.