प्रताप विद्या मंदिरात शिवजयंती साजरा

0

चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात 19 फेब्रुवारी ला शिवजयंती  साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वात प्रथम पी बी कोळी यांनी गीत गायले. व्ही ए गोसावी यांनी आपल्या भाषणातून राजा  शिवछत्रपती यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची कारकीर्द विविध प्रसंगांमधून विद्यार्थ्यांसमोर उभी केली. छत्तीस हत्तींचे बळ ज्यांच्यामध्ये आहे, तिन्ही लोकांमध्ये जे जाणले जातात,  शिस्तप्रिय, वाणीत तेज असलेले, जिजाऊंचे सुपूत्र व महाराष्ट्राची शान, हार न  मानणारे व राज्याचे हितचिंतक असलेले जनतेचा राजा म्हणून छत्रपतींची विविध उदाहरणे त्यांनी या  ठिकाणी दिली.

राजकारणाचं भान असणारा प्रचंड क्षमतेचा नेता, द्रष्टा प्रतिभावंत, महापराक्रमी योद्धा, उत्कृष्ट गनिमी कावा अवगत असलेला नायक, नवीन मूल्य, नवीन संस्कृती रुजवणारा विचारवंत अशा वेगवेगळ्या शब्दांमध्ये शिवाजी महाराज यांचे वर्णन अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक यांनी केले.

कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक डी के महाजन पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर आर शिंदे ,वाय एच चौधरी तसेच डी टी महाजन  व शिक्षक बंधू-भगिनी , लेखनिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.