प्रताप महाविद्यालयाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

0

अमळनेर (प्रतिनिधी):-येथील प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विज्ञान कला व वाणिज्य तसेच किमान कौशल्य शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज जी एस हायस्कूल, पी. बी  ए इंग्लिश मीडियम स्कूल व प्रताप कॉलेज येथे दिनांक 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान उपलब्ध होतील व भरलेले अर्ज तेथेच सकाळी 11 ते 5 या वेळेत  स्वीकारले जातील. विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी गुणवत्ता नुसार प्रवेश दिले जातील. गुणवत्ता याद्या प्रवेशासंबंधी सूचना वरील तिन्ही केंद्रांवर उपलब्ध असतील असे कॉलेजचे प्राचार्या ज्योती राणे,संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.