प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्याच्या हस्ते होणार ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

0

जळगाव ;- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ वा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ठीक ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, , जळगाव जिल्हा यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

सदर कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व स्वातंत्र्य सैनिक, विविध राजकिय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, जळगाव शहरातील सर्व नागरीक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केले आहे. जळगाव शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा, यासाठी दि. २६ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ८.३० ते १०.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १०.०० च्या नंतर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.