प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

0

पाचोरा (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे भडगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू व गरीब मुलांना शिवभोजन व मिठाई वाटप करण्यात आले. तसेच सन – २०२० सालातील परिषदेने केलेल्या विविध कार्य अहवालाचे प्रकाशन भडगाव येथील तहसिलदार तृप्ती धोडमिसे (आय. ए. एस. फस्ट रॅंक इन महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आले व राष्ट्रीय युवा परिषदेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल निकम यांनी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांचा सत्कार केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक पाटील यांनी केले.

याप्रसंगी युवा परिषदेचे तालुका उपाध्यक्ष निलेश नेरकर, सचिव मयुर अरुण वाघ चेतन राजपूत, कृष्णा पाटील, समन्वयक प्रतिक पाटील, यश शिंपी व स्टूडेंट ऑलिम्पिक असोसिएशन चे अमोल पाटील, ललित पाटील, कु. प्रतीक्षा सोनवणे, कु. मोहिनी पाटील, संदीप डाके, यज्ञेश पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.