निवडणूक स्थानिक उमेदवाराविरूद्ध नसून मोदींविरोधी लढवित आहे- डॉ. उल्हास पाटील
जळगांव. दि.2-
रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी की काँग्रेस असे तळयात मळयात सुरू असतांना उमेदवार शोधून देखिल मिळत नसल्याने अखेर काँग्रेसकडे ती जागां सोपवून डॉ उल्हास पाटील यानी आज 2 एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल केला. त्यावेळी ते म्हणाले की जिल्हयात प्रस्थापित जो बीजेपी पक्ष नेहमीच खेाटे बोलणारा आहे, कपाशीला 7000 भाव मागणारे आहेत त्यांना घरी बसविण्यासाठी व धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. हि निवडणूक स्थानिक उमेदवाराविरूद्ध नसून केवळ मोदींविरोधात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे अन्डरस्टँडींग होते तिकीट मिळाले असते वा नसते तरी सहकारी पक्षाबरोबर सहकार्यानेच काम करणार असून राहुल गांधी व शरद पवार यांचे सरकार आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार आहे.
आघाडीच्या सर्व पदधिकार्यांशी चर्चा करून सन्माननीय तोडगा काढला आहे. जिल्हयात 11 व मलकापूर ची जागा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. स्थानिक पदाधिकारी विविध 56 पक्षांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातुन एकदिलाने सर्वसामान्यांना न्याय देण्याची भमिका पार पाडण्यासाठी एकदिलाने कार्य करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षात काय मिळाले त्यांनी केवळ रेल्वेला थांबा दिला आहे त्यामुळे त्यांना यावेळी थांबा द्या, बलुन बंधारे, को.प.बंधारे यापेकी कोणतेही विकास कामे पुर्ण झाले नाही असे मनोगत माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी सांगीतले. यावेळी जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील, माजी आ.शिरीष चौधरी, डॉ.राधेशाम चौधरी, आ.डॉ.सतीष पाटील, डी.जी.पाटील, अॅड.ललिता पाटील, अॅड.संदिप पाटील, जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, सभापती दिलीप पाटील,माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणताही धेाका होउ नये. म्हणून डमी उमेदवारी – डॉ.सतीष पाटील
प्रत्येक पक्षात पद्धत आहे. सबऑर्डीनेट उमेदवार म्हणून फॉर्म भरावा लागतो. पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे डमी अर्ज भरला आहे. जिल्हयात भाजपाचे नेते काहीही करू शकतात. नुकतेच त्यांच्या पक्षातुनच माहिती मिळाली जळगांव बिनविरोध होते आहे. यामुळे काहीही होउ शकते त्यामुळे कोणताही धेाका होउ नये. म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरला आहे.
भाजपामधे जे गोंधळाचे वातावरण सुरू आहे. कुठे डॉ. सतीष अण्णावर कोणतेही मंत्र तंत्र होणार नाही. आमचा उमेदवार सक्षम आहेे . दुसरे असे देखिल ऐकायला मिळाले कि, स्मिता वाघ यांचे नाव कमी होते आहे व दुसरे नाव पुढे येत आहे असे समजते. नाव घेण्यात काही अर्थ नाही. आमच्या कउे तसे नाही. माझे नाव आल्यानंतर त्यांचे उमेदवार स्मिता वाघ यांचे नाव कमी होणार नाही. उमेदवार वा मुल पळवू नये. असे होउ शकते परंतु हा प्रयत्न होउ नये म्हणून मी अर्ज दाखल केला आहे. सर्वाच्या म्हणण्या प्रमाणे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या सक्षम उमदेवाराकडे सोपवली आहेत. कार्यकत्यांच्या भावनांचा आदर करून व काँग्रेस कार्यकत्यार्ंमधे गैरसमज पसरत चालला होता. असहकाराची लाभले असते तर चितेंची बाब झाली असती ते होउ नये म्हणून म्हणून सर्वानुमते अॅड. रविंद्र पाटील सक्षम उमेदवार असताना सुदधा डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबा देउन सहकार्य करणार आहे.
गिरीष महाजन उद्दामपणाने जे बोलतात आम्ही देाघे जागा जिंकू, परंतु आम्हाला विश्वास आहे. जळगांव सह रावेर या दोन्ही जागा जिंकून त्यांना सक्षमपणे जिल्हयात उत्तर देणार आहे.
जि.प.ची अभद्र युती बद्दल काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी चुक दुरूस्त करावी
जिल्हा परीषदेत देखिल कॉग्रेसचे सदस्य आहेत त्यांनी केलेले चुका दूरूस्त करणार आहेत. बीजेपीने जे केलेले आहे ते दुरूस्त करण्याची भावना आहे.काँग्रेसला पाठींबा देणारे सदस्य आहेत त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट करावे वा राजीनामा देउन बाहेर पडावे. शिवसेनची मुमिका करतात काही बोलतात काही करतात यामुळे त्यांचेवर जनतेचा विश्वास उरलेला नाही.