प्रक्षोभक आमदारांच्या यादीत गुलाबराव पाटील , शिरीष चौधरींचा समावेश

0

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिर्फार्म्स (एडीआर)कडून यादी जाहीर
मुंबई : प्रक्षोभक भाषण करणार्‍या देशातील आमदार व खासदारांची यादी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिर्फार्म्स (एडीआर) ने नुकतीच जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील तीन आमदारांचा समावेश आहे. यात सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगाव, अमळनेरचे अपक्ष आ. शिरीष चौधरी, जळगाव व आ. हर्षवर्धन जाधव औरंगाबाद याच्या नावाचा समावेश आहे.
प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांच्या यादीत भाजपचे 10 खासदार आणि 17 आमदार आहेत. यातील चार आमदार महाराष्ट्रातील आहेत.

देशातील 43 आमदारांवर गुन्हे दाखल
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशातील 43 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. यात भाजपाचे 17, टीआरएस व एमआयएमचे प्रत्येकी 5, कॉग्रेस, तृणमूल, जेडीयू व शिवसेना यांचे प्रत्येकी 2 टिडीपीचे 3, डीएमके, बसपा, सपा यांचे प्रत्येक एक तर दोन अपक्ष आमदार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

राज्यातील गुन्हे दाखल असलेले आमदार
गुलाबराव पाटील, शिवसेना आमदार, जळगाव , शिरीष चौधरी, अपक्ष आमदार, अमळनेर, जळगाव, हर्षवर्धन जाधव, शिवसेना आमदार, कन्नड, औरंगाबाद, संभाजी पाटील, बेळगाव

देशातील खासदार
एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, AIUDF चे बद्रुद्दिन अजमल , लालकृष्ण अडवाणी , मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती.

Leave A Reply

Your email address will not be published.