प्रकाश तेली यांना सोशल मिडीया ‘महामित्र’ पुरस्कार

0

जळगाव;- शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून समाज माध्यमांचा विधायक वापर करणाऱ्यांसाठी “महामित्र”ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.

या स्पर्धेचे निकष समाज माध्यमांमधील प्रभाव, समाज माध्यमे हाताळण्याची क्षमता व त्याचा प्रभावी वापर आशा आठ स्तरावर होती. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून एक अशी ही स्पर्धा घेण्यात आली होती प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमधून एका उमेदवाराची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली. या स्पर्धेमध्ये पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्रातून प्रकाश रामदास तेली यांची निवड जिल्हास्तर समिती ने केली होती ह्या स्पर्धेचा अंतिम सोहळा मा. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.
महामित्र या उपक्रमाचा अंतिम कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे 24 मार्च रोजी झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबतच आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपट पवार, डॉ. उदय निरगुडकर, सिनेमा कलाकार मकरंद अनासपुरे, स्पृहा जोशी, प्रतीक्षा लोनकर, मिलींद कांबळे ,चंद्रकांत कूलकर्णी, दीपक घैसाल, अशोक पानवलकर, प्रदीप लोखंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री तेली हे विधायक कार्यासाठी सतत प्रयत्नशील आणि कार्यरत असतात त्यामुळे त्यांना यापूर्वी हे बरेच पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या ह्या कार्याचे चे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.