Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात!
    जळगाव

    प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात!

    Tushar BhambareBy Tushar BhambareJanuary 31, 2020No Comments16 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिनव उपक्रम

    जळगाव : जाऊया फुलांच्या जगात…पिवळे, लाल, निळे, पांढरे…रंगीबेरंगी…असे म्हणत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फुलांचे महत्व, त्याचे फायदे जाणून घेत विविध फुलांच्या प्रकाराचे प्रात्यक्षिक करून पाहिले.

     

    प्रसंग होता मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील. विद्यार्थ्यांसाठी फुलांचा प्रकल्प शुक्रवारी ३१ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध रंगांची, विविध प्रकारची फुले विद्यार्थ्यांसाठी आणत त्यांना त्याची माहिती संस्थेचे सचिव व उपशिक्षक मुकेश नाईक यांनी करून दिली. फुलांचा उपयोग कुठे, कसा होतो याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शिक्षिका किरण पाटील यांनी विविध फुलांबद्दल माहिती सांगितली. प्रसंगी वातावरणात शिक्षिका रोहिणी शिंदे यांनी फुलांविषयी विविध गाणी सादर करीत कार्यक्रमात जल्लोष निर्माण केला.

     

     

    यावेळी विद्यार्थ्यांनी फुलांचे विविध प्रकार करून दाखविले. यात गजरा, तोरण, हार, वेणी यासह फुलांच्या सुरेख रांगोळ्या देखील विद्यालय परिसरात काढून दाखविल्या. या कलाकृती काढण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif