पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील पोलीस ठाण्याचे वाहनाने धडक दिल्याने दोन महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
याबाबत माहिती अशी की दि, १६ रोजी रात्री ८,१५ वाजता पारोळा पोलीस ठाण्यातील वाहन (क्र.एम.एच-१९ एम. ६५४) हे वाहन पारोळा येथील जिरो पोलीस अजय रानखांबे (रा, पारोळा) हे पारोळा पोलीस ठाण्याचे वाहन महामार्गावरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना गणेश भोजनालय तुन धुळे येथील दोन महिला बेबाबाई शेख कासीम ६५,फातीमा मिर्झा अयुब ५४ ह्या जेवण करून हाटेलातुन बाहेर पडत असताना पोलीस वाहनाने धडक दिल्याने त्यात दोघीही जखमी झाल्या त्यांना लागलीच पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा वर वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल परोचे यांनी प्रथमोपचार करून धुळे येथे रवाना केले, शासकीय वाहन जिरो पोलिसांच्या हाती घेले कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.