मुंबई | मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं म्हटलं आङे. “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे,” असं ते म्हणाले आहेत.
पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा आणि मग भरती करावी, या मागणीसाठी आमदार विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज भेट घेतली. याबाबत गृहमंत्री देशमुख सकारात्मक आहेत, असं मेटे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय राज्य सरकार देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.