Sunday, January 29, 2023

पोलीस भरतीबाबत राज्य सरकारकडून ‘जीआर’ जारी

- Advertisement -

मुंबई : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने जीआर जारी केला आहे. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

काय आहे जीआर

- Advertisement -

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात केली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया रखडली. मात्र, आता गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले आहेत. दरम्यान, 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे