Friday, September 30, 2022

पोलीस भरतीच्या परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चा प्रयत्न

- Advertisement -

जळगाव :  जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार करणारा मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आता तुम्ही म्हणाला मुन्नाभाई याचं नाव आहेत. तर नाही. मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानं अवलंबली होती. त्याच्या पायाच्या नी-क्यॅपमध्ये आणि कानात एक डिव्हाइस लपवलेलं होतं. पोलिसांनी वेळीच हटकल्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

नॉर्थ महाराष्ट्र क्नॉलेज सीटी कॉलेज या परिक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड (वय २७, रा. पांझणदेव, पो. नागापुर, ता. नांदगाव, जि. नाशिक) या उमेदवाराने परिक्षा दिली. आव्हाड याने लपवुन एक मोबाईल थेट परिक्षा केंद्रात नेला. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने फोटो काढुन घेत मित्राच्या मोबाईलवर पाठवले. यांनतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. त्यानुसार आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. यानंतर आव्हाड व त्याच्या मित्र या दोघांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड याने लघुशंकेचे कारण देत परिक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर मोाबईल आणल्याचा संशय पोलिसांना आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दुसऱ्या एका घटनेत वाघनगर येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रतापसिंग गुलचंद बालोद (वय २५, रा. वैजापुर, ता. आरंगाबाद) हा उमेदवार परिक्षेसाठी आला होता. त्याने एटीएम कार्डच्या आकाराचे एक डिव्हाईस सोबत आणले होते. या डिव्हाईसमध्ये मेमरी कार्ड होते. ते ब्लु टुथने कनेक्ट करुन स्पीकरमधुन आवाज घेण्यात आला होता. अत्यंत लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवून ठेवला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने कसुन तपासणी करण्यात आली. परिक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, प्रतापसिंगच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात आली. परिक्षेसाठी २१ हजार ६९० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्या पैकी ११ हजार ५३६ उमेदवारांनी परिक्षा दिली. तर १० हजार १५४ उमेदवार गैरहजर होते. १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा झाली. सायंकाळी चार वाजता ‘अॅन्सर की’ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. परिक्षा केंद्रावर १३५० पोलिस कर्मचारी व १०० अधिकारी असा एकुण बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या